मुंबई :मुंबई सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून वकील सुनील गोन्साल्विस यांनी प्रदीप शर्मा यांची प्रकृती ठीक असल्याचे युक्तीवादात म्हटले आहे. अनेक महिन्यांपासून प्रदीप शर्मा यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याकरिता विशेष डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावत प्रदीप शर्मा यांच्या प्रकृतीबाबत ससून रुग्णालयातील डिन यांना मेडिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद :प्रदीप शर्मा यांच्या वकिलांच्या वतीने शर्मा यांना फसविण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची फोन कॉल रेकॉर्डनुसार भेट झाली नसल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यात येऊ नये. या प्रकरणात सचिन वाझेप्रमाणे प्रदीप शर्मा यांचे देखील सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला होता.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती. त्यात गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.