मुंबई - दक्षिण घाट परिसरात जून महिन्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या, यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कर्जत ते लोणावळा घाट विभागात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे सीएसटी ते पुणे आणि पुणे ते सीएसटी दरम्यान काही एक्सप्रेस गाड्या 8 दिवस बंद राहणार आहेल. तर काही मेल गाड्यांची सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
या दुरुस्ती कामामुळे खालील मेल एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आला आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या-
गाडी नंबर 11008/11007 पुणे - सीएसएमटी - पुणे, 12126/ 12125 पुणे - सीएसएमटी - पुणे गाडी, 11139 सीएसएमटी ते जीडीजी एक्सप्रेस, 11140 जीडीजी एक्सप्रेस ते सीएसएमटी एक्सप्रेस (10 ऑगस्ट पर्यंत रद्द), 11023 सीएसएमटी ते कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस (पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द), 11024 कोल्हापूर ते सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द राहील. 17317 हुबली ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 8 ऑगस्टपर्यंत पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द, 17318 लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी एक्सप्रेस एलटीटी ते पुणे रद्द, 51318/51317 पुणे ते पनवेल -पुणे एक्सप्रेस रद्द, 17614 नांदेड ते पनवेल एक्सप्रेस पुणे ते पनवेल दरम्यान 8 ऑगस्टपर्यंत रद्द राहील.
गाडी क्रमांक 17613 पनवेल ते नांदेड एक्सप्रेस पनवेल ते पुणे दरम्यान रद्द, 07617 नांदेड ते पनवेल स्पेशल एक्सप्रेस ही 27 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द, 07618 पनवेल ते नांदेड स्पेशल एक्सप्रेस 28 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत सीएसएमटी ते पुणे दरम्यान रद्द राहील. 07617 नांदेड ते पनवेल स्पेशल एक्सप्रेस ही 27 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द, 07618 पनवेल ते नांदेड स्पेशल एक्सप्रेस 28 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत सीएसएमटी ते पुणे दरम्यान रद्द राहील.