महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: ट्विटरवरून दिली आत्महत्येची माहिती, मुंबई पोलिसांनी वाचवला तरुणाचा जीव

तरूणाने ट्विटरवरून आत्महत्येची माहिती दिली असता मुंबई पोलीसांनी तत्काळ घटनेची दखल घेत त्या तरूणाचा जीव वाचवला आहे. तरूण नैराश्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याचा विचार करत होता.

Mumbai Crime
मुंबई पोलीसांनी वाचवला तरुणाचा जीव

By

Published : Feb 18, 2023, 10:20 PM IST

मुंबई : आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास ताब्यात घेवून त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आले. त्या तरुणाने ट्विटर वरून आत्महत्या करणार असल्याची पोस्ट टाकली होती. त्यानंतर सतर्क मुंबई पोलिसांच्या कक्ष 5, 3 आणि 9 यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

ट्विटरवरून दिली आत्महत्येची माहिती: मुंबईत एका तरूणाने 17 फेब्रुवारीला आपल्या ट्विटर खात्यावरून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. या ट्विटमध्ये तरूणाने सांगितले की, मी आत्महत्या करत आहे. त्याआधी मला माझे अवयव दान करायचे आहेत. मी लहानपणीच ठरवले होते की मी मृत्यूपूर्वी माझे अवयव दान करेन. माझ्या करिअरमधील सततच्या अपयशामुळे मी आत्महत्या करत आहे. आणि हे आत्महत्येचे कारण आहे.

पोलिसांनी घेतली तत्काळ दखल: संबंधित घटनेत पोलिसांना ही माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, (प्रकटीकरण) गुन्हे शाखा, मुंबई यांचे नेतृत्वात गुन्हे शाखा कक्ष ५, कक्ष ३, कक्ष ९ व वेस्ट सायबर पोलीस ठाणे यांची संयुक्त पथके तयार करून त्यांना आत्महत्या करणार तरुणाचा लवकरात लवकर शोध घेणेबाबत सुचना दिल्या.

पोलिसांनी घेतले तरूणास ताब्यात: आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाबाबत पथकाने तात्काळ तांत्रिक विश्लेषण करून माहिती गोळा केली. या माहीतीच्या आधारे व मानवी कौशल्यांचा वापर करून पोलीस पथकाने तरुणास कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. 26 वर्षीय तरुणाकडे विचारणा केली असता तो १२ वी सायन्स उत्तीर्ण असून तो सध्या कामाच्या शोधात आहे. त्याने कोरोना काळात त्याचे वडीलांचे उपचाराकरीता तसेच दैनंदिन गरजांकरीता वेगवेगळ्या खाजगी संस्थांकडुन कर्ज घेतले असून सदर कर्जाचे हफ्ते व घरखर्च भागवू शकत नव्हते.

अवयव दान करणार असल्याचे केले ट्विट: तरूणाने मरणापूर्वी त्यावे शारिरीक अवयव गरजू व्यक्तीना दान करावयाचे असल्याने त्याने सदरचे ट्विट केले असल्याचे सांगितले. तरूणास ताब्यात घेवून कक्ष 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी समुपदेशन करून त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले असून त्यास त्याचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर मानोसपचार करण्याबाबत त्याच्या आईवडीलांना कळविण्यात आले आहे. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल तरुणच्या आईवडीलांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details