मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकराने सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली होती. या संचारबंदीला मुंबईकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
मुंबईकरांचा संचारबंदीला उस्फुर्त प्रतिसाद, पोलिसांकडून कौतुक
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या डोंगरी भागातही सर्व व्यवहार ठप्प होते. सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि जे.जे. समूह रुग्णालय जवळच असल्याने या भागात पायी चालणेही अनेकदा मुश्किल असते. मात्र, या भागात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकराने संचारबंदी लागू केली होती. या संचारबंदीला मुंबईकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या डोंगरी भागातही सर्व व्यवहार ठप्प होते. सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि जे.जे. समूह रुग्णालय जवळच असल्याने या भागात पायी चालणेही अनेकदा मुश्किल असते. मात्र, या भागात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. पोलिसांनी वारंवार आपल्या वाहनांतून नागरिकांना संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी.