महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीची सावध भूमिका, सत्तेचा तिढा चिघळला...

पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांची खासगीत भेट घेतली. तर त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा केली. या चर्चेत पटेल यांनी जयपूर येथे काँग्रेसकडे सुरू असलेल्या हालचाली आणि त्याविषयीच्या निर्णयावर पवार यांना माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

By

Published : Nov 10, 2019, 7:48 PM IST

भाजपच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीची सावध भूमिका

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी युती करून राज्यात बहुमताचा आकडा जमविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेकडून अखेरपर्यंत सत्तास्थापन करण्यासाठी साथ न मिळाली नाही. त्यामुळे भाजपने आज (रविवारी) आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे येण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय प्रसंगावर तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजपच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीची सावध भूमिका

पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांची खासगीत भेट घेतली. तर त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा केली. या चर्चेत पटेल यांनी जयपूर येथे काँग्रेसकडे सुरू असलेल्या हालचाली आणि त्याविषयीच्या निर्णयावर पवार यांना माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे पवार यांनी नवाब मलिक यांना राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर काय करता येईल या विषयाची माहिती जाणून घेतली असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा -काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा नाही,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details