महाराष्ट्र

maharashtra

Briquettes biomass : "ब्रिकेट्स बायोमास"चा प्रयोग राज्यात फसला पण मुंबई पालिका वापरण्यावर ठाम

स्मशानभूमीत लाकडाच्या माध्यामातून मृतदेह जाळल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर उपाय म्हणून शेती कचरा व वृक्ष कचरा यापासून तयार करण्यात आलेले ‘ब्रिकेट्स बायोमास’चा पर्याय समोर आला आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात हा प्रयोग फसला आहे. त्यानंतरही मुंबई महानगरपालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) आपल्या स्मशानभूमीमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Nov 28, 2022, 7:52 PM IST

Published : Nov 28, 2022, 7:52 PM IST

Updated : Nov 28, 2022, 9:22 PM IST

Briquettes biomass
"ब्रिकेट्स बायोमास"

मुंबई : स्मशानभूमीत लाकडाच्या माध्यामातून मृतदेह जाळल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर उपाय म्हणून शेती कचरा व वृक्ष कचरा यापासून तयार करण्यात आलेले ‘ब्रिकेट्स बायोमास’चा ( Briquettes biomass ) पर्याय समोर आला आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात हा प्रयोग फसला आहे. त्यानंतरही मुंबई महानगरपालिकेने आपल्या स्मशानभूमीमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमास’चा ( briquettes biomass in its crematorium ) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर खातरजमा केल्याशिवाय याचा वापर करू नये असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे.

दीड कोटींचे ब्रिकेट्स बायोमास -मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत पालिकेच्या आणि खासगी अशा २०० हुन अधिक स्मशानभूमी आहेत. त्यात एक मृतदेह जाळण्यासाठी ३०० किलो लाकूड मोफत दिले जाते. त्यावर लाकूड लागल्यास त्याचे पैसे मोजावे लागतात. पालिकेच्या काही स्मशानभूमीमध्ये विद्यूत शवदाहिनी तसेच गॅस दाहिनी आहेत. यामध्ये २५० रुपयात अंत्यसंस्कार केले जातात. लाकडाद्वारे मृतदेह जाळताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी ब्रिकेट्स बायोमासचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिकेट्स बायोमास - २६ डिसेंबर २०२२ पर्यंत १ कोटी ४६ लाख १७ हजार ९७७ रुपयांचे ब्रिकेट्स बायोमास पुरवठा करणे मे. लाह्स ग्रीन इंडिया प्रा. लि. कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदाराला ठरलेल्या दरानुसार पैसे देण्यात येणार असले तरी प्रत्येक स्मशानभूमीत प्रति मृतदेह दहनासाठी २५० किलो पर्यंत यानुसार एक महिन्याचा सुक्या ब्रिकेटचा पुरवठा झाल्यानंतर ठेकेदाराने स्मशानभूमी निहाय मासिक देयक दिल्यावर कंत्राटदाराला रक्कम दिली जाणार आहे. हिंदू स्मशानभूमीत लाकडा ऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा पुरवठा मोफत होणार असून यासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे आकारण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुक्या ब्रिकेट्सचा पुरवठा करणे, अटी शर्तीनुसार ब्रिकेट्स पुरवठा न झाल्यास स्वखर्चाने बदलून देणे, हिंदू स्मशानभूमी पर्यंत स्वखर्चाने पुरवठा करणे आदी अति शर्थी कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे.


तुलनेने अधिक पर्यावरणपूरक -मुंबईतील पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे लाकूड साधारणपणे दोन झाडांपासून मिळते. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. या चाचपणीनंतर ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर केला जाणार आहे.

यासाठी निर्णय घेण्यात आला -महानगरपालिकेच्या १४ पारंपरिक स्मशानभूमींमध्ये पर्यावरण पुरकतेचा भाग म्हणून लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने मुंबईतील १४ स्मशानभूमीत दहन करण्यासाठी वापरण्यात येणा-या लाकडांऐवजी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’ वापरले जाणार आहे. ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार केले जाते. त्यामुळे दरवर्षी १८ लाख ६० हजार किलो लाकूड वाचणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.


खातरजमा करून निर्णय घ्यावा - राज्यभरात ब्रिकेट्स बायोमास चा प्रयोग फसला आहे. असे असताना पालिका आपल्या हद्दीतील स्मशानभूमीत ब्रिकेट्स बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने राज्यातील अनुभव लक्षात घेऊन खातरजमा करूनच ब्रिकेट्स बायोमासचा वापर करावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे दिली आहे.


काय आहे ‘ब्रिकेट्स बायोमास’ -‘ब्रिकेट्स बायोमास’ हे इंधन ‘शेती कचरा व वृक्ष कचरा यापासून तयार करण्यात येते. शेती कच-यातील जो ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो, त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात. यामुळे सदर कच-याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरण-पूरकता देखील जपली जाते. पालिकेच्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांवर अंतीम संस्कार केले जातात. त्यानुसार या ठिकाणी मृतदेह दहनासाठी वर्षभरात सुमारे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणात लाकडांचा वापर होतो. प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र, लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’ मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असणार आहे.


या १४ स्मशानभूमीत होणार वापर - मंगलवाडी (बाणगंगा) स्मशानभूमी (डी), वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी (ई), गोवारी हिंदू स्मशानभूमी (एफ- उत्तर), धारावी हिंदू स्मशानभूमी (जी - उत्तर), खारदांडा हिंदू स्मशानभूमी (एच- पश्चिम), वर्सोवा हिंदू स्मशानभूमी (के- पश्चिम), मढ हिंदू स्मशानभूमी (पी - उत्तर), वडार पाडा हिंदू स्मशानभूमी (आर-दक्षिण), दहिसर हिंदू स्मशानभूमी (आर - उत्तर), चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी (एल), चिता कॅम्प हिंदू स्मशानभूमी (एम-पूर्व), आणिक गाव हिंदू स्मशानभूमी (एम-पश्चिम)
भांडूप गुजराती सेवा मंडळ स्मशानभूमी (एस), मुलुंड नागरीक सभा हिंदू स्मशानभूमी (टी) या स्मशानभूमीत वापर करण्यात होणार आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details