मुंबई - महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Corporation Commissioner Take Back Controversial Circular ) नी प्रसारमाध्यांना माहिती देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना बंदी घालण्याबाबतचे परिपत्रक ( Commissioner Iqbal Singh Chahal Controversial Circular ) काढले होते. हे परिपत्रक म्हणजे लोकशाही विरोधी असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा ( Corporation Opposition Party Leader Ravi Raja ) यांनी केली आहे. तसेच पत्रकारांनी आयुक्तांची भेट घेतल्यावर आयुक्तांनी ते परिपत्रक मागे घेतले आहे.
पत्रक लोकशाही विरोधी - मुंबई महापालिकेची माहिती ( Mumbai Municipal Corporation ) प्रसारमाध्यमांना देण्यासाठी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनाच अधिकार आहेत. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देऊ नये, असे परिपत्रक आयुक्त इकबाल सिंग चहल ( Corporation Commissioner Take Back Controversial Circular) यांनी काढले होते. याबाबत रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना, आयुक्त प्रसारमाध्यमांशी बोलत नाहीत. त्यांनी इतर अधिकाऱ्यांनाही माध्यमांशी बोलू नये, असे पत्रक काढले आहे. हे पत्रक लोकशाही विरोधी आहे. पालिका आयुक्त किंवा प्रशासन माहिती देणार नाही, तर नागरिकांना कशी माहिती मिळणार असा प्रश्न रवी राजा ( Corporation Opposition Party Leader Ravi Raja ) यांनी उपस्थित केला आहे.