महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचा मुंबईकरांना फटका; दुधाचा पुरवठा कमी

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचा फटका मुंबईकरांना बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यातून दूध पुरवठा न झाल्याने मुंबईमध्ये दूध कोंडी झाली आहे.

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचा मुंबईकरांना फटका; दुधाचा पुरवठा कमी

By

Published : Aug 8, 2019, 10:58 AM IST

मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील अस्मानी पूरपरिस्थितीचा परिणाम मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या दूध पुरवठ्यावर झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात गुरुवारी आणि पुढील दोन ते तीन दिवस दुधाचा तुटवडा निर्माण होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी विभागातून येणारे सुमारे 13 लाख लीटर दूध आज मुंबईत पोहोचले नाही. त्यामुळे दूध कोंडी झाली आहे.

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचा मुंबईकरांना फटका; दुधाचा पुरवठा कमी

गोकुळसारख्या ७ लाख लीटर दूध वितरित करणाऱ्या कंपनीमध्ये आज दूधच आले नाही. त्यामुळे आज नवी मुंबईतील डेअरी बंद आहे. आज पुणे, नाशिक तसेच कर्नाटक आणि गुजरात इत्यादी विभागातून काही प्रमाणात दूध आले आहे. मात्र, तो पुरवठा अंत्यत कमी आहे. कोल्हापूर, सांगलीमधील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली नाहीतर हा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महापुरामुळे सांगली आणि कोल्हापुरात दूध संकलन बंद करण्यात आले आहे. शिवाय उपलब्ध असलेले दूध मुंबईत पोहोचण्याची शक्यता नाही. कारण मुंबईकडे येणाऱ्या पुणे बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने काही दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत. जवळपास 13 लाख लीटर दुधाची आवक घटली आहे. आजही दुधाचे टँकर मुंबईत येणार नसल्याने पुढील किमान ३ दिवस तरी दुधाचा तुटवडा भासणार आहे. दरम्यान चितळे कंपनीकडून पुणे, सांगली आणि नवी मुंबईला नियमित दूध पुरवठा करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

गोकुळचे साडेपाच लाख लिटर दुधाचे टँकर पुरामध्ये अडकले -

गोकुळचे साडेपाच लाख लिटर दूध टँकरमध्ये अडकले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. यामुळे गोकुळ दूध संघाचे दुधाचे टँकर भरून जागेवरच थांबले. किमान दहा लाख लिटर दूध शिल्लक असल्याची माहिती संघाने दिली आहे. याचा फटका गोकुळच्या आर्थिक व्यवहारावर बसणार आहे.

मुंबई शहरात आज गोकुळ आणि वारणा दूध पुरवठा झाला नाही. अमूल आणि महानंदाकडून दूधपुरवठा केला जात आहे. पुढील तीन दिवसाचे दूध संकट पाहता त्यांचाही पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे मुंबईकरांनी दुधाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन दूध वितरक आदिनाथ पांगिरे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details