मुंबई -मागील वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे पालिकेला राखीव पाणीसाठा वापरावा लागत होता. मात्र गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावात १ लाख ४ हजार ४९६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.
गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे एका दिवसात ४ दिवसाचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हयात गेले चार दिवस समाधानकारक पाऊस पडत आहे. पावसामुळे शुक्रवारी तलावांत ७१ हजार १७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. शनिवारी तलावांत ७६ हजार ८३३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता. तर रविवारी सकाळी तलावांत ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे आज सकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ४ हजार ४९६ इतका पाणीसाठा जमा झाला आहे.