महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींच्या वक्तव्याचा घाटकोपरमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांकडून निषेध

झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया या घोषणेच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी केलेले वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे असल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे.

By

Published : Dec 14, 2019, 2:13 AM IST

मुंबई- झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया या घोषणेच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी केलेले वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे असल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे. याप्रकरणी भाजपकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. शुक्रवारी सांयकाळी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात ईशान्य मुंबई भाजप महिला मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम येथे 'नारी के सन्मान मे भाजप मैदान मे', 'राहुल गांधी हाय हाय'च्या घोषणा देण्यात आल्या. भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी परिसरात जोरदार निदर्शने केली. तसेच राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. एकीकडे देशात नागरिकत्व बिलाचा विरोध काँग्रेसकडून संसदेत व राज्यसभेत करण्यात आला तर भाजपकडून राहुल गांधी यांना लक्ष करत त्यांच्या विधानाचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी महिलांची माफी मागावी, अशी या आंदोलकानी मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details