महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत प्रवास करा आता फक्त 'पाच रुपयात', बेस्टच्या भाडेकपातीला राज्य परिवहन विभागाचा हिरवा कंदील

सामान्य मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई बेस्ट बसचा 'किमान प्रवास' आता फक्त 'पाच रुपयात' शक्य होणार आहे. उद्यापासून बेस्टचे नवीन दर लागू होणार आहेत.

By

Published : Jul 8, 2019, 11:27 PM IST

मुंबई बेस्ट बसचा 'किमान प्रवास' आता फक्त 'पाच रुपयात' शक्य होणार

मुंबई- बेस्ट बसचा भाडेकपातीचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने मान्य केला असून, बेस्टचा 'किमान प्रवास' आता 'पाच रुपयात' होणार आहे. देशातल्या इतर राज्याच्या तुलनेत महाग असणाऱ्या मुंबई शहरात या भाडेकपातीमुळे स्वस्त प्रवास करणे शक्य होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे मुंबईकरांकडून स्वागत केले जात आहे.

बस प्रकार अंतर दर
साधी बस 0 ते 5 किमी

5 रू

एसी बस

6 रू

साधी बस

5 ते 10 किमी

10 रू
एसी बस

13 रू

साधी बस 10 ते 15 किमी

15 रू

एसी बस 19 रू
साधी बस 15 किमी वर

20 रू

एसी बस

25 रू

मुंबई बेस्ट प्रशासनाने भाडे कपातीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला सोमवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मान्यता दिली. या संदर्भातील अधिसूचना राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत निर्गमित करण्यात आली आहे. बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीनां राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे बेस्टसाठी आता 'किमान प्रवास भाडे पाच रुपये' असेल. उद्यापासून हे नविन दर लागु होणार आहेत. "बेस्टच्या इतर टप्प्यांच्याही प्रवास भाड्यात कपात केली जाईल", अशी माहिती ही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details