महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut on Shiv Sena Anniversary : गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही - संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिवस आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या निमित्ताने दोन वर्धापन दिवस साजरे होत आहेत. मूळच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर (बाळासाहेबांची शिवसेना) सडकून टीका केली आहे.

MP Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Jun 19, 2023, 12:49 PM IST

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. संजय राऊत म्हणाले आहेत की, आज दोन नाही. एकच वर्धापन दिन आहे. त्या आमच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. मागील ५७ वर्ष शिवसेना अग्नीकुंडाप्रमाणे धगधगते आहे. या ५७ वर्षांमध्ये अनेक चढउतार आले. कोणी सोडून गेले, कोणी नवीन आले, पुन्हा शिवसेनेने उभारी घेतली. शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रत्येक वेळेला शिवसेना नव्या जोमाने उभी राहिली आणि प्रत्येक वेळेला शिवसेनेने आकाशाला गवसणी घातली.

शिवसेनेची दिल्लीपर्यंत धडक : मुंबई स्थापन झालेली शिवसेना मुंबई ठाण्याच्या पुढे जाणार नाही, हे त्या काळात म्हटले जात होते. पण या शिवसेनेने दिल्लीपर्यंत धडक मारली. शिवसेनेचे योगदान फार मोठे आहे. जम्मू काश्मीरपर्यंत शिवसेना गेली. शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली. दिल्लीत सत्तेवरती आली. ती फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे, नरेंद्र मोदी आणि शाह यामुळे नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.


५७ वा वर्धापन दिन :शिवसेनेचा आजचा वर्धापन दिन हा ५७ वा आहे. काल मुंबईमध्ये काही ठिकाणी मी त्या गद्दार गटाचे होर्डिंग पाहिले. त्या ठिकाणी ५९ वा वर्धापन दिन लिहिले होते. आपण पहा, त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहीत नाही. ते शिवसेनेवर दावा सांगतात. इलेक्शन कमिशनकडून एक कागद आणतात. अलीकडे डुप्लिकेट सातबारा, बोगस सातबाराची प्रकरण खूप वाढली आहेत. अब्दुल सत्तार यांनी दिलेला हा सातबारा आहे. ५८ वा वर्धापन दिन तारीख आणि वर्ष माहिती नाही. खोटे सात बारे, जन्म तारीख गोळा करायचे शेतकऱ्यांचे आणि हे नाचवायचे. मात्र पुन्हा ही शिवसेना महाराष्ट आणि देशात उभारी घेऊन जनतेची इच्छा पूर्ण करणार आहे. ही शिवसेना मर्द मावळ्यांची भगवतगीता आहे. याच भगवत गीतेच्या पानापानाचा अभ्यास आणि विचारांचे अखंड प्राशान करून इथपर्यंत पोहचली आहे. बाळासाहेब यांनी लढण्यासाठी जहाल विचार दिला. तो चोरला जात नसतो, असे अनेक चोर त्या काळात पैदा झाले. बाळासाहेबांनी ढेकण्यासारखे चीरडून टाकले, त्यांची तीच अवस्था होईल.


अजित दादा बिग बी :सुप्रिया सुळे सांगत आहे, त्याप्रमाणे अजित पवार महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. ते बिग बी आहेत. काल शिवसेनेचा मेळावा होता. जसा विचार मांडायला पाहिजे, तसा आम्ही तो मांडला. शिंदे मिंदेकडेच फेविकॉलचा जोड आहे असे नाही. महाविकास आघाडीमध्ये देखील फेविकॉलचा जोड आहे. उद्धव ठाकरे यांची देखील इच्छा आहे. २५ वर्षे महाविकास आघाडी टिकावी. ती २५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार असे शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षाला आणि गद्दारांना मातीत गाडावे आणि तसेच करणार आहोत. अजित पवार यांना मनात काहीच शंका असण्याचे कारण नाही. आपण सगळे एक आहोत, एकत्र राहून लढू असेही राऊत म्हणाले.


चाळीस कोटीची फाईल :शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जी पद शिवसेनेकडे आहेत ते शिवसेनेकडेच राहतील. ती गोष्ट खोके पैसे यांना मोजता येणार नाही. चाळीस कोटीची कुठलीतरी फाईल झाली, म्हणून त्या बाई गेल्या, असे काल मी व्यासपीठावरती ऐकले. मला माहिती नाही. ही लोक येतात कुठून, जातात कुठे, कसे हा संशोधनाचा विषय आहे. भविष्यामध्ये आम्हाला याचा विचार करावा लागेल.



अति शहाणपणाचा अहंकार :देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांना कोणीतरी लिहून देत. ते शेरोशायरी डायलॉग बोलत असतात. त्यांना कळेल त्यांची नौका किती डगमगत आहे. त्यांना भविष्यात कळेल तेच शहाणे आणि आम्ही सर्व मूर्ख आहोत का? अति शहाणपणाचा अहंकार माणसाला डुबवतो. ते शेर शायरी खूप करतात. त्यांना मी शेर सूनवतो. तुफान मे कष्टी और अहंकार में हस्तीया डूब जाती है, तुमचा अहंकार तुम्हाला डुबवल्या शिवाय राहणार नाही. असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut Defamation Claim: संजय राऊत यांचा किरीट सोमय्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा; जाणून घ्या कारण...
  2. Sanjay Raut On Amit Shah : पाकिस्तानसारखा चीनमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिम्मत आहे का, खासदार संजय राऊत यांचा सवाल
  3. Nitesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत क्रांतिवीर नाही, त्यांनी मराठी लोकांची घरे लुटली- नितेश राणेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details