महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Shewale : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राहुल शेवाळे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप (allegations on Aditya Thackeray) केले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या (Sushant Singh Rajput Case) मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने ४४ वेळा फोन आले होते. लोकसभेत ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला (Rahul Shewale allegations on Aditya Thackeray) आहे.

Shinde group MP Rahul Shewale allegations
राहुल शेवाळे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

By

Published : Dec 22, 2022, 12:01 PM IST

मुंबई :१४ जून २०२० रोजीसुशांत सिंहत्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला (Sushant Singh Rajput Case) होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन गट निर्माण झाले होते. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला गेला. आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने ४४ वेळा फोन आले, असे त्यांनी म्हटले आहे. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले (Rahul Shewale allegations on Aditya Thackeray) आहे.

आरोपांवर हरकत :दरम्यान, खासदार शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. त्यांनी सभापतींकडे विनंती केल्यानंतर संबंधित आरोप संसदेच्या कामकाजातून वगळले (allegations on Aditya Thackeray) आहेत.

तपासात समोर :राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले की, रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरे आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात (Rahul Shewale allegations) आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा. ‘एयू’ हा विषय अतिशय गंभीर आहे. एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी, असे शेवाळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details