महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता....सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

पंतप्रधानांची पत्रकार परिषदेत ‘मौन की बात'; राज ठाकरेंची मोदींवर टीका. जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चकमक, १ दहशतवादी ठार. आई-मुलाच्या नात्याला काळीमा, सख्ख्या मुलानेच केला जन्मदात्रीवर बलात्कार. एटीएम मशिनमधून निघाली ५०० रुपयाच्या नोटेच्या आकारातील एलआयसीची पावती! बीडमध्ये महिला भूमापकाला जागा मोजणीपासून अडवणूक; अधिकाऱ्यांची भूमाफियांना साथ.

By

Published : May 18, 2019, 9:02 AM IST

महत्वाच्या घडामोडी

पंतप्रधानांची पत्रकार परिषदेत ‘मौन की बात'; राज ठाकरेंची मोदींवर टीका

मुंबई - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांची पत्रकार परिषद ‘मौन की बात’ होती, असे ट्विट करत राज ठाकरेंनी केले आहे. वाचा सविस्तर...

जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चकमक, १ दहशतवादी ठार

पुलवामा - सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत शनिवारी सकाळी १ दहशतवादी ठार झाला. दक्षिण काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील पंझगाम या गावात ही चकमक सुरू आहे. रात्री २:१० वाजता चकमक सुरू झाली. वाचा सविस्तर...

आई-मुलाच्या नात्याला काळीमा, सख्ख्या मुलानेच केला जन्मदात्रीवर बलात्कार

सातारा- जिल्ह्यातील वाई तालुक्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

एटीएम मशिनमधून निघाली ५०० रुपयाच्या नोटेच्या आकारातील एलआयसीची पावती!

अमरावती - एटीएम मशिनमधून २८ हजार रुपये काढताना २७ हजार ५०० रुपयेच बाहेर आलेत. विशेष म्हणजे या रकमेसोबत एक पांढऱ्या रंगाचा कागदही बाहेर आला. ५०० रुपये कमी आले असताना सोबत ५०० रुपयाच्या नोटेच्या आकाराची एलआयसीची पावती हाती लागल्याने एका व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. गर्ल्स हायस्कुल चौक येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये आज हा धक्कादायक प्रकार घडला. वाचा सविस्तर...

बीडमध्ये महिला भूमापकाला जागा मोजणीपासून अडवणूक; अधिकाऱ्यांची भूमाफियांना साथ

बीड- जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. शनी मंदिर संस्थांच्या कोल्हेर ता. गेवराई येथील ३० एकर जागा मोजण्यापासून महिला भूमापक अधिकारीला भूमाफियाने अडवणूक केल्याची घटना घडली आहे. मात्र, या प्रकरणी भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी भूमाफियांना पाठिशी घातलाना दिसत आहेत. एस. एम. कांगरे असे त्या महिला अधिकारीचे नाव असून अनुपम राधेशाम अट्टल असे त्या भुमाफियाचे नाव आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details