मुंबई -राज्यात बुधवारी (दि. 9 जून) दिवसभरात 16 हजार 369 रुग्ण करोनातून बरे झाले असून 10 हजार 989 नव्या कोरोनाग्रस्त आढळून आले. 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.45 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1लाख 1 हजार 833 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे.