मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 568 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.54 टक्के एवढा आहे.
राज्यात एकाच दिवसात 54 हजार 985 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवाडा भासत आहे. त्यातच वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
- राज्यात 54 हजार 985 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
- राज्यात आतापर्यंत 32 लाख 68 हजार 449 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
- राज्यात नव्या 67 हजार 468 रुग्णांची नोंद झाली आहे.
- राज्यात 24 तासांत 568 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे.
- राज्यात एकूण 40 लाख 27 हजार 827 रुग्णांची नोंद झाली आहे.
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 95 हजार 747 इतकी झाली आहे.
- राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 7,654
ठाणे- 1,039
ठाणे महानगरपालिका - 1,343
नवी मुंबई-961
कल्याण डोंबिवली- 1,231
उल्हासनगर-158
मीराभाईंदर-684
पालघर-777
वसई विरार महानगरपालिका -712
रायगड-966
पनवेल महानगरपालिका -898
नाशिक-2,234
नाशिक महानगरपालिका -4,469
अहमदनगर-2,096
अहमदनगर महानगरपालिका -896
धुळे- 238
जळगाव-1003
नंदुरबार-371
पुणे- 2998
पुणे महानगरपालिका - 5,538
पिंपरी चिंचवड- 2,316
सोलापूर- 1,131
सोलापूर महानगरपालिका -331
सातारा - 1,648
कोल्हापुर-571
कोल्हापूर महानगरपालिका -192
सांगली- 941
सिंधुदुर्ग-179
रत्नागिरी-338
औरंगाबाद-603
औरंगाबाद महानगरपालिका -588
जालना-877
हिंगोली-249
परभणी -493
परभणी महानगरपालिका -335
लातूर 1,198
लातूर महानगरपालिका-439
उस्मानाबाद-729
बीड -1,056
नांदेड महानगरपालिका-425
नांदेड-893
अकोला महानगरपालिका-172
अमरावती महानगरपालिका-228
अमरावती 472
यवतमाळ-1230
वाशिम - 367
नागपूर- 2,395
नागपूर महानगरपालिका-5,160
वर्धा-889
भंडारा-1160
गोंदिया-606
चंद्रपुर-1125
चंद्रपूर महानगरपालिका-451
गडचिरोली-561
हेही वाचा -मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात; 62 बाधितांचा मृत्यू