मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारा दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. शनिवारी 30 ऑक्टोबरला 1 हजार 130 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 26 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 148 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.57 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
16 हजार 905 सक्रिय रुग्ण
आज राज्यात 1 हजार 130 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 09 हजार 906 वर पोहचला आहे. तर आज 26 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 196 वर पोहोचला आहे. आज 2 हजार 148 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 49 हजार 186 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.57 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 25 लाख 59 हजार 171 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.57 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 064 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 16 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत घट
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 11 ऑक्टोबरला 1 हजार 736, 14 ऑक्टोबरला 2 हजार 384, 15 ऑक्टोबरला 2 हजार 149, 25 ऑक्टोबरला 889, 26 ऑक्टोबरला 1 हजार 201, 27 ऑक्टोबरला 1 हजार 485, 28 ऑक्टोबरला 1 हजार 418, 29 ऑक्टोबरला 1 हजार 338, 30 ऑक्टोबरला 1 हजार 130 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण