महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंदा राज्यात ६२ हजारांपेक्षा जास्त अंध मतदारांची नोंदणी

मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील.

By

Published : Oct 18, 2019, 6:43 PM IST

यंदा राज्यात ६२ हजारांपेक्षा जास्त अंध मतदारांची नोंदणी

मुंबई - राज्यातील २३ हजार १०१ मतदान केंद्रांवर ६२ हजार ३६६ अंध मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ३ लाख ९६ हजार ६७३ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३८ हजार ७६३ मूकबधीर, शारिरीक हालचाल करण्यास असक्षम असे व्यंग असलेले १ लाख ७६ हजार ६१५ आणि अन्य स्वरुपाचे १ लाख १८ हजार ९२९ दिव्यांगांचा समावेश आहे.

हेही वाचा -निवडणूक काळात 'एक्झिट पोल' जाहीर करण्यास निवडणूक आयोगाची मनाई

यामध्ये राज्यातील ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांपैकी ६५ हजार ४८३ मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ हजार ९५७ मतदान केंद्रावर मूकबधीर, ४२ हजार ९०५ मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम असे दिव्यांग आणि २० हजार ४६५ हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -लोकसभा निवडणुकीत राबलेल्या करा़डच्या कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप थकलेलेच

या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतील. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना निवडणुकीत सुलभतेने मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details