महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग, आरोपी अटकेत

घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थींनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड (वय 20) या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहे.

आर सिटी मॉल, घाटकोपर

By

Published : Sep 24, 2019, 12:43 PM IST

मुंबई - घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थींनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड (वय 20) या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा -वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग

दहिसर येथील एका शाळेतील विद्यार्थिनी 18 सप्टेंबरला घाटकोपरच्या आर सिटी मॉल मधील किडझानिया मध्ये पिकनिक साठी आल्या होत्या. दरम्यान, गेम झोनमध्ये एक कार राइडींग करता 5 मुली बसवण्यात आल्या. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी रणवीर राठोड याने तक्रारदार मुलीला बेल्ट लावण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावर स्पर्श केला. यावेळी त्या मुलीने विरोध दर्शवला असता आरोपीने येथे असेच चालते असे सांगितले. राईड संपल्यानंतर मुलींनी ही घटना आपल्या शिक्षिकेला सांगितली. यानंतर शाळा व्यवस्थापनाने किड्झानिया मॅनेजरला लिखित तक्रार दिली.

हेही वाचा -भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार

घटना मुलीच्या कुटूंबियांना समजल्यानंतर कुटुंबाने त्वरित शाळेत या घटनेविषयी तक्रार केली. यानंतर दुसऱ्या दिवशी पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये दोन मुलींनी व कुटुंबांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. तर पीडित विद्यार्थिनींच्या कुटुंबियांनी किडझनिया व्यवस्थापनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबांनी आपल्या मुलांना एक अविश्वास आणि सुरक्षा लक्षात घेता पाठवावे, असे त्यांनी सांगितले. कुटुंबाचा आरोप असा आहे, की किडझनिया व्यवस्थापकाला याविषयी तक्रार देऊनही त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने, पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली आहे.

हेही वाचा -मोबाईलला रेंज नसल्याने 'या' गावाचा मतदानावर बहिष्कार

आर सिटी मॉल मधील किडझानियामध्ये चित्रपटाचे प्रमोशन करिता अभिनेता शाहरुख खान यांनी या ठिकाणी बऱ्याचदा आपल्या सिनेमाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मॉलचे आकर्षण असते.

ABOUT THE AUTHOR

...view details