महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेकडून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी, चौकातील झाडांचा अडथळा हटविला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (प्रभाग क्र. 129) मधील शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी केली. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गीते यांनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पडलेले झाड हटविले.

मनसेकडून स्वातंत्र्यवीर सावरक जयंती साजरी, चौकातील झाडांचा अडथळा हटवला
मनसेकडून स्वातंत्र्यवीर सावरक जयंती साजरी, चौकातील झाडांचा अडथळा हटवला

By

Published : May 28, 2021, 10:27 PM IST

मुबंई -महाराष्ट्र नवनिर्माण सेना (प्रभाग क्र. 129) मधील शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी केली. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गीते यांनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पडलेले झाड हटविले. मागील 10 दिवसांपासून हे झाड येथे पडले होते. मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही याची कुणी दखल घेतली नव्हती. त्यामुळे सावरकरांच्या जयंतीच्या औचित्याने गीते यांनी हे झाड येथून हटविले. दरम्यान, सावरकर चौकात सावरकरांच्या फलकाला पुष्पहार घालून त्यांची जयंतीही साजरी करण्यात आली.

मनसेकडून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी, चौकातील झाडांचा अडथळा हटविला

'तौक्ते वादळामुळे कोसळले होते झाड'

तौक्ते वादळात काही झाडे कोसळली होती. त्यामध्ये चौकातीलही काही झाडे रस्त्यावर आडवी पडली होती. तसेच, शाळेसमोरील असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर नामकरण बोर्डाचेही नुकसान झाले आहे. गेल्या 10 दिवसांपासून मनसेने स्थानिक प्रशासनास ही बाब लक्षात आणून दिली होती. मात्र, त्यांनी लक्ष न घातल्याने स्वतः मनसे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी या कामात लक्ष घालून ते पूर्ण केले.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन

ABOUT THE AUTHOR

...view details