मुंबई - कुर्ला ठक्कर बाप्पा कॉलनीतील बेपत्ता झालेल्या आरतीचा शोध लागला असून, तिचा 10 महिन्यापूर्वीच रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे उघडकीस झाले आहे. आपल्या मुलीचा शोध लागत नसल्याने वडिलांनी सहा महिन्यापूर्वीच आत्महत्या केली होते. धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता मुलीचा मार्च 2019 मध्येच टिळक नगर आणि चेंबूर दरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. तशी नोंद वडाळा रेल्वे पोलिसात आहे. अपघात झाल्यावर तीन महिन्यांनी तिचा मृतदेह बेवारस म्हणून, तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कारही केले. या सर्व घटनेमुळे रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नातेवाईकांनी बोट ठेवले आहे.
अंत्यसंस्कारानंतर 'त्या' मुलीला दहा महिने शोधत होते पोलीस हेही वाचा - सैनिक पत्नीच्या दागिण्यांवर डल्ला मारणाऱ्या महिला चोरांना अटक
आपली मुलगी 6 महिने बेपता झाल्याने आणि पोलीस तपासात प्रगती होत नसल्याने तिचे वडिल पंचाराम रिथडीया यांनी नैराशेत टिळकनगर ते चेंबूर दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कार यात्रेवेळी हजारोच्या संख्येने लोक एकत्र आले होते. यात काही उपद्रवी लोकांनी खाजगी व पोलीस गाड्यांची तोडफोड व पोलिसांना मारहाणही केली होती.
गेल्या वर्षी 30 मार्च 2019 रोजी आरती रिथाडीया ही कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा कॉलनी येथून बेपत्ता झाली होती. तिचे वडील पंचाराम रिथाडीया यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरती सापडत नसल्याने रिथडीया नेहरूनगर पोलीस ठाण्यात चौकशी करित होते. मात्र, पोलीस आपल्याला सहकार्य करित नसल्याच्या कारणाने रिथाडीया यांनी हार्बर मार्गावरील टिळक नगर आणि चेंबूर स्थानकादरम्यान 13 ऑक्टोबर 2019 ला लोकल रेल्वेखाली आत्महत्या केली होती. मुलगी बेपत्ता आणि वडिलांची आत्महत्या यामुळे ठक्कर बाप्पा कॉलनीतील तणाव निर्माण झाला होता. स्थानिक लोकांनी आणि नातेवाईकांनी पंचाराम यांचेवर अंत्यसंस्कार न करता आरतीच्या तपासाचे काय झाले ते पोलिसांनी सांगावे असे म्हणून मृतदेह ताब्यात घेण्सास नकार दिला. त्यामुळे इतर राज्यातील रिथडीया यांचे समाज बांधव मोठ्या संख्येने कुर्ला येथे एकत्र आले 22 ऑक्टोबर रोजी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करायचे ठरले. यावेळी हजारो लोक अंत्यसंस्कार यात्रेत आले होते. काही लोक प्रक्षोभ झाले आणि त्यानी पोलिसांवर हल्ला केला व खाजगी वाहनावर दगड फेक केली होती. यावेळी पोलिसानी सौम्य लाठीचार्ज केला व मोठया संख्येने युवकांना पकडून त्यांचेवर विविध प्रकारच्या कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, पंचराम यांची आत्महत्या आणि बेपत्ता मुलीचा शोध लागत नाही याबत रिथाडीया कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हे शाखा तपास करित असताना सायन रुग्णालयात एका बेवारस मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नोंद होती. त्याचा तपास केला असता फोटो आणि कपड्यांच्या मदतीने तो मृतदेह हा आरतीचाच असल्याचे तिच्या कुटुंबाने ओळखले आहे.
हेही वाचा - पैशाच्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर