मुंबई - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या दि म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. ही निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली असून असे न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेच्या म्युनिसिपल बँकेच्या निवडणुकीत गैरप्रकार, पराभूत उमेदवारांचा आरोप हेही वाचा -"नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी पाचशे कोटींचे ड्रोन"
या बँकेचे ८६ हजार सभासद असून ७४ हजार मतदार आहेत. १७ फेब्रुवारीला बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. यात ३३ हजार ६४२ नागरिकांनी मतदान केले. निवडणुकीत ११ पॅनल्सने सहभाग घेतला होता. यात जय सहकार, परिवर्तन, सहकार, संघर्ष हे चार महत्वाचे पॅनल होते. मतमोजणी प्रक्रियेनंतर जय सहकार पॅनलचे १५, परिवर्तन आणि सहकार पॅनलचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी झाले.
हेही वाचा -तुमच्या पुर्वजांनी छत्रपतींचा राज्याभिषेक का नाकारला होता - नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार
या निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. 'मतमोजणी दरम्यान मतपत्रिका आम्हाला दाखवण्यात आलेल्या नाही. १२९ पैकी १२७ टेबलवर मतमोजणी करताना त्याठिकाणी काय झाले याची आम्हाला माहिती देण्यात येत नव्हती. यामुळे मत मोजणीवेळी गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या गैरप्रकारची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी जी. डी. पाटील यांच्याकडे केली. मात्र आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले', असा आरोप विजय तळेकर यांनी केला. याबाबतची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री, उप निबंधक तसेच बँकेचे अध्यक्ष असलेल्या पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती तळेकर यांनी दिली.