मुंबई- चेंबूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी मागील २५० दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी आज (मंगळवारी) राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी भेट घेतली. उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांना १५ दिवसात त्यांच्या रखेडलेल्या घरांची समस्या सोडवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
पंचशील नगरच्या राहिवाशांचा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावू - रविंद्र वायकर
बूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी गेले २५० दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी आज राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी भेट घेतली.
यापूर्वीही उपोषण कर्त्यांना संवाद साधण्यासाठी स्थानिक आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली होती. मात्र, २५० दिवस उलटूनही उपोषण कर्त्यांची समस्या तशीच आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उपोषण कर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सदर इमारतीचे बांधकाम प्रशासनाकरवी थांबवले होते. या ठिकाणी जो प्रश्न रखडलेला होता त्या इमारतीची पाहणी स्वतः राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.