मुंबई -येथून बिहार राज्यात जाण्यासाठी आज (बुधवार) दुपारी 4च्या सुमारास विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. याकरिता पोलिसांकडे नोंदणीकृत १ हजार २०० मजुरांना बेस्ट बसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सोडण्यात येणार आहे. तत्पूर्वी, नोंदणीसाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे नोंदणीकृत मजुरांना बोलवण्यात आले होते. मात्र, यावेळेस त्यांच्यासह नोंदणी नसलेल्या मजुरांनीही गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीला नियंत्रणात ठेवताना पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
स्वगृही परतण्यासाठीची धडपड, मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर परप्रांतीय मजुरांची गर्दी
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून आज (बुधवार) बिहारकरिता रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या पार्किंग क्षेत्रात नोंदणीकृत सदस्यांना बोलवण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांच्यासह नोंदणी नसलेल्या मजुरांनीही गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गर्दीला नियंत्रणात ठेवताना पोलिसांना कसरत करावी लागली.
आज (बुधवार) येथील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पार्किंग क्षेत्रात परराज्यात जाण्यासाठी नोंदणीकृत मजुरांना बोलविण्यात आले असता या ठिकाणी नोंदणी नसलेले मजुरही आले. पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळविताना नोंदणी न केलेल्या मजुरांना तेथून हटविले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बिहार राज्यात जाण्यासाठी दुपारी 4 नंतर रेल्वे सोडण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथ्यांदा वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या शेकडो परप्रांतीयांची घरी परतण्यासाठी कसरत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल सकाळी वांद्र्यातील रेल्वेस्थानक परिसरात परप्रांतीय मजुरांनी मोठी गर्दी केली होती. ही, गर्दी काही केल्या कमी होत नसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.