महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana : खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात पुढील सुनावणी 20 जानेवारीला, अटकेची टांगती तलवार कायम

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात (MP Navneet Rana caste verification case) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यापुढील अडचणी कायम आहेत. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट जैसे थे ठेवले आहे. नवनीत राणा यांच्या वकिलाने न्यायालयासमोर आज या प्रकरणात सोनवणे दरम्यान म्हटले की सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात 17 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या कारवाईवर स्टे देण्यात यावा मात्र न्यायालयाने स्टे देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी (Next hearing on January 20) होणार आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Jan 5, 2023, 3:26 PM IST

Updated : Jan 10, 2023, 6:36 PM IST

मुंबई : नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या वकिलांकडून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करत अर्ज मागील सुनावणी दरम्यान शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांकडून उत्तर दाखल करण्यात आले नसल्याने या प्रकरणात पुढील सुनावणी (Next hearing on January 20) पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश आज पुन्हा सरकारी वकिलांना देण्यात आले आहे.



पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र (MP Navneet Rana caste verification case) मिळवल्याप्रकरणी नवनीत व त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिवडी न्यायालयाने दोघांविरुद्ध चारवेळा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. आवरण सध्या कायम असल्याने नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग कोर त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.


अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र : नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



सरेंडर करण्याचे आदेश दिले होते :2021 मध्ये राणाला मुंबई उच्च न्यायालयाने तिचे प्रमाणपत्र फसव्या पद्धतीने मिळविल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर ते सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला होता की, अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेवर तिला खासदारपदाची निवडणूक लढवता यावी म्हणून फसवणूकीचा दावा करण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज जाणीवपूर्वक राणाने केला होता. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र दोषारोपपत्र दाखल झालेल्या दंडाधिकारी न्यायालयात कामकाज सुरूच होते.



काय आहे प्रकरण :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग यांच्यावर मुंबईतील मुलूंड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी शिवडी दंडअधिकारी न्यायालयात खटला चालू आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो दंडअधिकारी न्यायालयाने फेटळून लावला आहे. त्यानंतर या निर्णयाला नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टाने अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करत सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून तोच निर्णय काय ठेवला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Last Updated : Jan 10, 2023, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details