महाराष्ट्र

maharashtra

मुंबई - रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4 .40  वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप व डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.

By

Published : Jun 19, 2021, 9:46 AM IST

Published : Jun 19, 2021, 9:46 AM IST

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 20 जून 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.


ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4 .40 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप- डाऊन धीम्या मार्गावरील वाशी/ बेलापूर/पनवेल- सीएसएमटी वडाळा रोड आणि सीएसएमटी-वांद्रे -गोरेगाव दरम्याच्या लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, याकरिता मध्य रेल्वेकडून पनवेल आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच याब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप व डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉककालावधीत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावते असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी मेगाबॉल्क असणार आहे. शनिवारी- रविवारी रात्री वसई रोड ते वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.10 ते रविवारी पहाटे 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील सर्व मेल-एक्सप्रेस 15 मिनिटे उशिराने धावतील. तर, गाडी क्रमांक 09101 विरार-भरूच मेनू पहाटे 4.35 वाजेऐवजी पहाटे 4.50 वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details