मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने मुंबईतील मुबारक वसीम खान मार्ग, टँक स्ट्रीट या ठिकाणी केलेल्या कारवाईत एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम वजनाचे एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
मुंबईत ३० लाखाचे एमडी ड्रग जप्त - Md drug confiscated Mumbai
अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल ही कारवाई करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीचे नाव अहमद अब्दुल अहमद अन्सारी असे असून तो मुंबई व मुंबई उपनगर परिसरामध्ये एमडी या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता.

मुंबईत ३० लाखाचे एमडी ड्रग जप्त
अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल ही कारवाई करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीचे नाव अहमद अब्दुल अहमद अन्सारी असे असून तो मुंबई व मुंबई उपनगर परिसरामध्ये एमडीची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता. अहमद अन्सारी हा मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाणे, जेजे मार्ग पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत.