मुंबई :पिंस्टोर्म या कंपनीचे संस्थापक मार्केटर महेश मूर्ती यांनी सिंगापूर येथील फॅशन टेक या कंपनीच्या एक सहसंस्थापिका अंकिता बोस यांच्या संदर्भात बदनामीकारक लेख एका मासिकात लिहिला, असा आरोप करीत अंकिता बोस हिने अब्रू नुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला आहे. त्यामध्ये 820 कोटी रुपये अब्रू नुकसानीपोटी त्यांनी मागितलेले आहे. झिलिंगो फॅशन टेक कंपनीच्या सीईओ पदावरुन अंकिता बोस हिला काढून टाकले जात आहे. तिला निलंबित केले गेले, अशा पद्धतीचा लेख मार्केटर आणि इन्स्टॉल या कंपनीचे प्रमुख महेश मूर्ती यांनी प्रसिद्ध केला होता.
अंकिता बोस हिची मानहानी :त्या लेखांमध्ये त्यांनी सिंगापूरच्या कंपनीच्या सहसंस्थापिका अंकिता बोस यांच्याबाबत काही वक्तव्य प्रसिद्ध केले होते. फॅशन टेक फोर झिलिंगो या कंपनीची अंकिता बोस ही मुख्य कार्यकारी अधिकारी होती. परंतु तिला काही कारणाच्या निमित्ताने कंपनीने निलंबित केलेले आहे. या प्रकारचे विधान महेश मूर्ती यांनी भारतातील एका प्रसिद्ध इंग्रजी मासिकात प्रसारित केले होते. महेश मूर्ती यांनी अंकिता बोसबाबत जे विधाने केलेली आहे. ज्या काही टीका आणि टिप्पण्या देखील केलेल्या आहे. त्यामुळे अंकिता बोस हिची मानहानी झालेली आहे. तसेच बदनामी देखील झालेली आहे. म्हणून या कारणास्तव महेश मूर्ती यांनी अंकिता बोस हिला बदनामी केल्यामुळे 820 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना केलेली आहे.