महाराष्ट्र

maharashtra

Maharashtracha Favourite Kon : कलाकारांच्या मांदियाळीत रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार सोहळा

उत्सुकतेचा कळस गाठलेला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार हा सोहळा नुकताच सेलिब्रिटींच्या मांदियाळीत दिमाखात पार पडला. आकर्षक कपडे, स्टायलिश फॅशन अशा लुकमध्ये झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींनी लक्ष वेधून घेतले.

By

Published : Jan 28, 2023, 1:48 PM IST

Published : Jan 28, 2023, 1:48 PM IST

Maharashtracha Favourite Kon award
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार

प्रत्येक कलावंताला पुरस्कार खूप महत्वाचा असतो. पुरस्कार म्हणजे त्यांच्या कलेला मिळालेली पावती. वर्षाच्या सुरुवातीला अनेक पुरस्कार सोहळे होत असतात आणि महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांसोबतच कलाकारांनाही आवडणारा हा पुरस्कार सोहळा आहे. सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार, दिग्दर्शक, खलनायिका, खलनायक यासह १२ विभागातील महाराष्ट्राचा फेव्हरेट कलाकार निवडला जातो.

आकर्षक कपडे, स्टायलिश फॅशनचा लुक

उत्सुकतेचा कळस गाठलेला हा सोहळा नुकताच सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. आकर्षक कपडे, स्टायलिश फॅशन अशा लुकमध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींनी लक्ष वेधून घेतले. हा सोहळा १२ फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. १५ डिसेंबरला, महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांची नामांकने मोठ्या दिमाखात जाहीर करण्यात आली होती.

पुरस्कार म्हणजे त्यांच्या कलेला मिळालेली पावती

त्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीसाठी वोटिंग लाईन्स सुरू करण्यात आली होती .या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांच्या आवडत्या कलाकाराला मत देण्यासाठी वाहिनीने जाहीर केलेल्या विविध माध्यमांवर प्रेक्षकांनी आपली मते नोंदवली होती. दरवर्षी वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांशी निगडित विविध विभागातील कलाकारांसाठी प्रेक्षकांकडून त्यांच्या पसंतीचा कलाकार कोण हे जाणून घेत त्याला पुरस्कार दिला जातो.

प्रत्येक कलावंताला पुरस्कार खूप महत्वाचा असतो

नेत्रदीपक विद्युत रोषणाई, विविध कलाकारांचे थिरकायला लावणारे डान्स परफॉर्मन्स आणि विनोदी स्कीटची हास्याचे फवारे उडवणारी फोडणी अशा रंगतदार वातावरणात महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा सोहळा अक्षरशः उंचीवर नेऊन ठेवला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्याला चांगलीच रंगत आली . लवकरच हा सोहळा प्रेक्षकांना वाहिनीवर पाहायला मिळणार आहे .

पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

यावेळी अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री अमृता खानविलकर, यावर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, मकरंद अनासपुरे, ललित प्रभाकर, प्रथमेश परब, अमेय वाघ, शरद केळकर, भाऊ कदम, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, दिग्दर्शक नागराज मंजुळे ,दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्याच बरोबर ज्याच्या चित्रपटाने सध्या सर्वांना वेड लावलंय असा अभिनेता रितेश देशमुख अशा एकाहून एक सेलिब्रिटीच्या उत्साहात सहभागी झाले होते.

हेही वाचा : Ranbir Kapoor Throws Mobile : वारंवार सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला वैतागून रणबीर कपूरने मोबाईल फेकला; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details