महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना सत्यजित तांबे

By

Published : Oct 5, 2019, 6:17 PM IST

मुंबई - प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के राखीव जागा आणि बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला


युवक काँग्रेस कॉल बॅक ऑफ महाराष्ट्र 'उद्यासाठी आज..' हा जाहीरनामा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यभरातील युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील तब्बल तीन कोटी तरुणांना भेटलो. तरूणांकडून लाखो सुचना आल्या असून त्यातील काही महत्त्वाच्या सूचना आम्ही जाहीरनाम्यात घेतल्या आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण, शिष्यवृत्ती आणि नोकरी या विषयांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

हेही वाचा - आरे प्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून खोटा प्रचार -मुंबई मेट्रो प्रमुख अश्विनी भिडे

आमच्या पक्षाचे सरकार आले तर ३१ ऑक्टोबरपर्यंतचे सर्व शैक्षणिक कर्ज आम्ही माफ करू. शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया महाविद्यालयात व्हावी, यासाठी उपाययोजना करू. खासगी, सरकारी वसतिगृह ही व्यवस्था अपुरी आहे. गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी आर्थिक निकषांवर शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत, अशी आश्वासनेही तांबे यांनी दिली.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये ४० जणांचा समावेश

महापोर्टल बंद करून एमपीएससीच्या माध्यमातून जागा भरणार येतील. राज्यात युवक कल्याण नावाचे खाते अस्तित्वात नाही, आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही ते स्थापन करू. राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा मानसदेखील तांबे यांनी बोलून दाखवला. गड किल्ल्याच्या सुशोभीकरण करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन केंद्र करण्याचा संकल्प आमच्या जाहीरनाम्यात केला आहे. स्टार्टअपसाठी ५०० कोटी रुपयांचे भागभांडवल आम्ही वेगळे ठेऊ. राज्यातील युवक सरकारच्या खोटेपणाला कंटाळले आहेत, त्यामुळे तेच सरकारला खेचून खाली आणतील, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details