महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar Meeting : अध्यक्षपदावर राहायचे होते तर राजीनामा का दिला? अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

शरद पवारांमुळे मी आहे (Ajit Pawar Meeting) इथपर्यंत आलो आहे. प्रत्येकाचा (Maharashtra Political Crisis) काळ येत असतो. 2022 मध्ये भाजपसोबत जाण्यासंदर्भातले राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक (Maharashtra Political Crisis) पत्र शरद पवार यांना दिले होते. शरद पवार यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता तर कशाला दिला? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला आहे. तसेच आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा सवालही अजित पवार यांनी विचारला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 5, 2023, 2:51 PM IST

Updated : Jul 5, 2023, 4:45 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबोधन

मुंबई - शरद पवारांमुळे (Ajit Pawar Meeting) मी आहे इथपर्यंत आलो आहे. प्रत्येकाचा काळ येत असतो. 2022 मध्ये भाजपसोबत जाण्यासंदर्भातले राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक पत्र शरद पवार यांना (Maharashtra Political Crisis) दिले होते. शरद पवार यांना राजीनामा द्यायचा नसेल तर दिला कशाला? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला आहे. शरद पवार यांनी (NCP Political Crisis) हट्टा का केला हे जनतेला समजले पाहिजे. हे मी सुप्रिया सुळे यांनादेखील बोललो होतो, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

आजपर्यंत लोकांसमोर मला व्हिलन केले जातं आहे ते कळत नाही. आजही माझे श्रद्धास्थान शरद पवार आहेत. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावे तर ती म्हणाली ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत, मात्र, माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसाने कधीतरी थांबावे, तरूणांना संधी कधी देणार? पण हे सर्व कोणासाठी चालले हे? असे चित्र का निर्माण केले जात आहे - अजित पवार, उपमुख्यमंत्री

सुप्रिया सुळेंवर निशाणा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवारांकडून मोदींचे कौतुक - पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे नेतृत्व या देशात नाही. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखे नेते लाभले हे आपले भाग्य आहे. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आलो आहोत. कन्याकुमारीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करत आहे. केंद्र हे राज्याला कोट्यावधीचा निधी देणार आहे. त्यामुळे याचा आपल्याला फायदा होणार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

भेदभाव करणार नाही - राष्ट्रवादीसोबतच शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदारांना एकच न्याय देणार आहे. कोणीही नाराज होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याचा विकासगाडा वेग घेणार आहे. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत कोणालाही एकटे पडू देणार नाही, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबोधन

फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका -2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितले होते. त्यांच्यासोबत जायचे नव्हते तर का तिथे आम्हाला पाठवले होते. 2017 मध्येदेखील असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले, आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आले की बाहेर काहीच बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवार यांचा राष्ट्रवादीवर दावा, निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल
  2. Sharad Pawar Meeting : राज्याच्या इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही - शरद पवार
  3. AJit Pawars NCP Meeting: वसंतदादा यांना असेच वाईट वाटले असेल...-छगन भुजबळ यांची शरद पवारांवर टीका
Last Updated : Jul 5, 2023, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details