मुंबई:महाराष्ट्र शासनाने दिवाळीच्या दरम्यान पोलीस भरतीची जाहिरात काढली. मात्र 29 ऑक्टोबर रोजीच जाहिरात स्थगित केली. त्यामुळे हजारो पोलीस भरतीसाठीच्या उमेदवारांची निराशा झाली. त्यानंतर आता पुन्हा पोलीस भरतीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस भरतीसाठी चे पोर्टल धड चालत नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.
पोलीस भरतीची वेबसाईट धड चालत नाही पोलीस भरती संदर्भात निर्णय जाहीर: महाराष्ट्र शासनाने महा रोजगार मिळावा आयोजित केला. आणि वर्षाला 75 हजार रोजगार उपलब्ध करू, अशी घोषणा केली. राज्यामध्ये एकूण 3 लाख सरकारी नोकर भरतीची गरज असल्याचे सातत्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समिती विविध राजकीय पक्षांचे नेते यांनी वेळोवेळी नमूद केलेल आहे. या सर्वांच्या दबावामुळे शासनाने पोलीस भरती संदर्भात निर्णय जाहीर केला. मात्र पोलीस भरती संदर्भातील शासकीय पोर्टल धड चालत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरलेली आहे.
वेबसाईट चालत नाही कारण काय ?स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे समन्वयक राहुल गोठेकर यांनी सांगितले की, विद्यार्थी शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे ओळखपत्र शालेय महाविद्यालयीन कागदपत्र सह डेटा भरण्यासाठी शासनाने अधिकृत केलेल्या पोर्टलवर माहिती भरत आहे. मात्र शासकीय वेबसाईट धड चालत नाही. त्यामुळे रात्री 3-4 तास जागूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो असे त्यांनी नमूद केले.
पोलीस भरती रखडली: याबाबत आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी ईटीव्ही सोबत बातचीत करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरती रखडली होती. शासनाने उशिरा का होईना पोलीस भरती सुरू केली. मात्र यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे क्रम प्राप्त आहे. परंतु पोलीस भरतीसाठीचे पोर्टलजे आहे. ते व्यवस्थित सुरू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना 4-5 वेबसाईटवर कंप्यूटर समोर बसून राहावे लागते. त्यामुळे हे म्हणजे त्यांच्या पदरी घोर निराशा येण्याचे चिन्ह आहे. राज्यामध्ये मोठमोठ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील चांगल्या कंपन्या असताना महाराष्ट्र शासन वेबसाईट धड व्यवस्थित चालवू शकत नाही. त्यामुळे शासनाने यावर ताबडतोब दाखल घेणे जरुरी आहे.