महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

MAHARASHTRA CORONA UPDATE LIVE 25TH JUNE 2021
राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : Jun 25, 2021, 7:25 AM IST

Updated : Jun 25, 2021, 10:21 PM IST

22:20 June 25

सातारा जिल्हा : कोरोनाबाधितांसह मृतांची सर्वाधिक संख्या कराडमध्ये

सातारा - जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपर्यंतच्या अहवालानुसार कोरोनाबाधित आणि मृतांची आकडेवारी जाहीर झाली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 814 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये कराडमध्ये सर्वाधिक 213 जण कोरोनाबाधित आले असून 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कराडमध्ये 10 जणांचा एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कराड तालुक्यात 786 जणांना कोरोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 26,684 झाली आहे. सातारा जिल्ह्यात आजअखेर 4,303 रूग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्यामध्ये सातार्‍यात 1,218, कराड 786, खटाव 478, कोरेगाव 380, वाई 329, फलटण 280, माण 255, पाटण 193, खंडाळा 193, जावली 191 आणि महाबळेश्वर 44 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

20:14 June 25

Maharashtra Covid 19 Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; सरकारचा नवा आदेश

मुंबई -महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही राज्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्य सरकारडून नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली असून सर्व जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

15:13 June 25

मुंबईत सात ठिकाणी झालेल्या बोगस लसीकरणाचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई - मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की मुंबई विभागात विविध ठिकाणी बोगस लसीकरणाच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत बोगस लसीकरणाविरोधात 7 गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस लसीकरणाचा पर्दाफाश करत डॉक्टर पती-पत्नीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांदिवलीमध्ये 8 आरोपींना अटक केली आहे.  शिवम हॉस्पिटलमधून खोटे लसीकरण पुरविले आहे. कांदिवली प्रकरणात 220 नागरिकांचे जबाव नोंदवले आहेत. बोरिवलीत 555 नागरिकांचे बोगस लसीकरण केले आहे. बोगस लसीकरणाचे रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आले आहे. 9 ठिकाणी बोगस लसीकरण झाले आहे. 

15:12 June 25

कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण नाहीत, पण धोका अधिक असल्याने सतर्क राहा -पालकमंत्री

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही. मात्र त्याचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला अधिक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे रुग्ण आढळले आहेत. त्या जिल्ह्यातील लोक उपचार घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

15:03 June 25

डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी

रत्नागिरी - जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील येथील आहे. मृत महिला वय हे 80 वर्ष आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. 

12:12 June 25

देशात 51 हजार 667 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली -गेल्या २४ तासांत देशात 51 हजार 667 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. तर 64 हजार 527 हे बरे झालेले आहेत. तर 1 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 01 लाख 34 हजार 445  कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात 6 लाख 12 हजार 868 सक्रिय रुग्ण आहेत. तर 2 कोटी 91 लाख 28 हजार 267 रुग्ण हे आतापर्यंत बरे झाले आहेत. तर 3 लाख 93 हजार 310 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाले आहेत. 30 कोटी 79 लाख 48 हजार 744  नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

10:05 June 25

बारामतीत आठ गावात अंशतः लॉकडाउन..

बारामती -येथे आठ गावामध्ये वाढता कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील आठ गावात दहा पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीत आठ गावात २४ जूनपासून सात दिवस पुढील आदेश होईपर्यंत अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंशतः संचारबंदी करण्यात आली आहे. यामध्ये गावात खाजगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय, मंगल कार्यालय, मॉल, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार आहेत. केवळ मेडीकल, कृषि सेवा केंद्रे, किराणा दुकाने, दुध डेअरी सुरू राहणार आहेत.

09:15 June 25

नागपूरात कोरोना मृत्यू शुन्यच

नागपूर -जिल्ह्यात गुरुवारी आलेल्या अहवालात 6 हजार 647 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 46 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 21 तर ग्रामीण भागात 24 बाधित रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर घटला आहे. मागील आठवड्यात सलग चार दिवस आणि या आठवड्यात दोन दिवस शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा नोंदवल्या गेले आहेत. यात बरे होण्याचा दर 97.98 टक्क्यावर आलेला आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या घटल्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या घटून आता 616 वर आली आहे. 

08:59 June 25

रत्नागिरीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ

रत्नागिरी - राज्यातील अनेक जिल्हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच विळखा बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवस कोरोना रुग्णांची प्रतिदिन संख्या पाचशेवर स्थिर राहिली आहे. गुरुवारी ५४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे डेल्टाचे सावट जिल्ह्यावर असल्याने प्रशासनासह आरोग्य खात्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ७ हजार २८३ तापसण्या करण्यात आला. त्यामध्ये ५४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूचा दर २.८४ टक्के आहे. तर सध्या ६२०३ रुग्णावर उपचार आहे. 

08:03 June 25

नाशिककरांवर तिसर्‍या लाटेचे संकट!

नाशिक - मागील काही दिवसांपासून स्थिर असलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही नाशिककरांसाठी चिंताजनक बाब आहे. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला नसला तरी वाढती रुग्णसंख्या तिसर्‍या लाटेचा धोका दर्शवत असल्याचे इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.

कोरोनाचा वाढता धोका बघता जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहे. शनिवारी- रविवारी पर्यटन स्थळी गर्दी दिसून येत आहे. पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुपारी चारनंतर दुकाने बंद झाली, तरी नागरिक संचारबंदी असुनही विनाकारण घराबाहेर पडत आहे. ते बघता संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

06:31 June 25

राज्यात गुरुवारी १९७ मृतांची नोंद

मुंबई - राज्यात दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने बदलताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गुरुवारी दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे.

Last Updated : Jun 25, 2021, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details