महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी, राम मंदिराचा साकारला देखावा

सिंहासनावर आसनस्थ बाप्पाची राम स्वरुपातील लोभस मूर्ती येथे विराजमान आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९२ वे वर्ष आहे.

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

By

Published : Sep 9, 2019, 4:42 AM IST

मुंबई -सतत कोसळणाऱ्या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सव पाहण्यासाठी घराबाहेर निघाले आहेत. मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'गणेशगल्ली' मंडळाने यंदा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिराचा देखावा साकारला आहे.

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

हेही वाचा- अंबानी आणि बच्चन कुटुंबीयांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

सिंहासनावर आसनस्थ बाप्पाची राम स्वरुपातील लोभस मूर्ती येथे विराजमान आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९२ वे वर्ष आहे.

हेही वाचा - देखावे पाहण्यासाठी पुण्यातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले

मुंबईचा राजा हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १० दिवस मोठ्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांना घराबाहेर निघणे कठिण झाले होते. मात्र, आता पावसाने उसंत घेतल्यानंतर गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची रिघ लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details