महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.91 टक्के मतदान

या टप्प्यात 10 मतदारसंघात एकूण 1 कोटी 16 लाख 67 हजार 506 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 62 लाख 86 हजार 879, स्त्री 53 लाख 80 हजार 575 आणि 52 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे.

By

Published : Apr 20, 2019, 8:26 AM IST

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.91 टक्के मतदान

मुंबई -लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला पार पडले. राज्यातील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने जाहीर केली. त्यानुसार दहा मतदारसंघात मिळून सरासरी 62.91 टक्के मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.


दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची मतदानाची अंतिम टक्केवारी :

बुलडाणा 63.68 टक्के, अकोला 60 टक्के, अमरावती 63.86 टक्के, हिंगोली 66.60 टक्के, नांदेड 65.15 टक्के, परभणी 63.19 टक्के, बीड 66.08 टक्के, उस्मानाबाद 63.42 टक्के, लातूर 62.20 टक्के आणि सोलापूर ‎58.45 टक्के असे एकूण सरासरी 62.91 टक्के मतदान झाले आहे.

हिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक राहिली असून सर्वात कमी टक्केवारी सोलापूर मतदारसंघाची राहिली. या टप्प्यात 10 मतदारसंघात एकूण 1 कोटी 16 लाख 67 हजार 506 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 62 लाख 86 हजार 879, स्त्री 53 लाख 80 हजार 575 आणि 52 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे. बीड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या होती. तेथे सर्वाधिक 13 लाख 48 हजार 856 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 7 लाख 31 हजार 723 पुरुष, 6 लाख 17 हजार 132 स्त्री आणि 1 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय मतदान केलेल्या पुरुष, स्त्री व तृतीयलिंगी मतदारांची संख्या आणि झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे:


बुलडाणा- पुरुष 6 लाख 1 हजार 840, स्त्री 5 लाख 18 हजार 321, तृतीयलिंगी 1, एकूण 11 लाख 20 हजार 162, अकोला- पुरुष 6 लाख 7 हजार 89, स्त्री 5 लाख 9 हजार 886, तृतीयलिंगी 5, एकूण 11 लाख 16 हजार 980, अमरावती- –पुरुष 6 लाख 2 हजार 464, स्त्री 5 लाख 3 हजार 474, तृतीयलिंगी 9 एकूण – 11 लाख 5 हजार 947, हिंगोली- – पुरुष 6 लाख 18 हजार 34, स्त्री 5 लाख 35 हजार 763, तृतीयलिंगी 1 एकूण – 11 लाख 53 हजार 798, नांदेड- – पुरुष 5 लाख 94 हजार 614, स्त्री 5 लाख 24 हजार 490, तृतीयलिंगी 12 एकूण – 11 लाख 19 हजार 116, परभणी- – पुरुष 6 लाख 77 हजार 599, स्त्री 5 लाख 76 हजार 11, तृतीयलिंगी 2 एकूण 12 लाख 53 हजार 612, उस्मानाबाद- – पुरुष 6 लाख 41 हजार 697, स्त्री 5 लाख 54 हजार 461, तृतीयलिंगी 11 एकूण- 11 लाख 96 हजार 169, लातूर- – पुरुष 6 लाख 25 हजार 442, स्त्री 5 लाख 46 हजार 35, तृतीयलिंगी 3 एकूण – 11 लाख 71 हजार 480, सोलापूर- – पुरुष 5 लाख 86 हजार 377, स्त्री 4 लाख 95 हजार 2, तृतीयलिंगी 7 एकूण – 10 लाख 81 हजार 386.

ABOUT THE AUTHOR

...view details