महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2021, 9:05 PM IST

ETV Bharat / state

मेमध्ये घरविक्री मंदावली! लॉकडाऊनचा फटका, महिन्याभरात राज्यात केवळ 66 हजार घरांची विक्री

डिसेंबर 2020 मध्ये वर्षभरातील सर्वाधिक घरविक्री झाली. तब्बल 2 लाख 55 हजार घरे विकली गेली. यातून 2 हजार 464 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मार्च 2021 मध्ये तर या सवलतीचा चांगलाच फायदा ग्राहकांनी घेतला त्यामुळे घरविक्रीतून विक्रमी महसूल मिळाला. मार्चमध्ये 2 लाख 13 हजार 413 घरे विकली गेली आणि यातून तब्बल 9 हजार 66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

lockdown effect on home sale
मे मध्ये घरविक्री मंदावली! लॉकडाऊनचा फटका, महिन्याभरात राज्यात केवळ 66 हजार घरांची विक्री

मुंबई -मार्च 2021 मध्ये विक्रमी 2 लाख 13 हजार 413 घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपात तब्बल 9 हजार 66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. पण एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू झाले आणि त्याचा मोठा फटका घरविक्रीला बसू लागला. एप्रिलमध्ये 94 हजार 813 घरे विकली गेली यातून 1 हजार 256 कोटीचा महसुल मिळाला. आता मे महिन्यात घरविक्री आणि महसुलात आणखी घट झाली आहे. मेमध्ये राज्यभरात 66 हजार 534 घरे विकली गेली असून यातून 874 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.


'या' सवलतीमुळे ऑक्टोबर ते मार्चदरम्यान घरविक्री जोरात

मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्चअखेरीस लॉकडाऊन लागले. मुद्रांक शुल्क वसुली आणि नोंदणी व्यवहार ऑनलाइन सुरू झाले. त्यामुळे अर्थचक्र बऱ्यापैकी बंद झाले आणि एप्रिल महिन्यात याचा विपरीत परिणाम घरविक्रीवरही झाला. एप्रिलमध्ये राज्यात केवळ 777 घरे विकली गेली होती तर यातून केवळ 3 कोटी 11 लाखांचा महसूल मिळाला होता. हा आतापर्यंतचा सर्वात कमी महसूल आणि घरविक्री मानन्यात येत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्याने गेल्या वर्षी घरविक्री आणि महसूल घटतच होता. अशावेळी राज्य सरकारने महसूल वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात कपात केली. सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 3 टक्के अशी दर कपात केली. तर 1 जानेवारी ते 31मार्च 2021 पर्यंत 1 टक्के आणि 2 टक्के दर कपात लागू केली. सरकारच्या सवलतीचा चांगला फायदा ऑक्टोबर ते मार्च दरम्यान झाला. डिसेंबर 2020 मध्ये वर्षभरातील सर्वाधिक घरविक्री झाली. तब्बल 2 लाख 55 हजार घरे विकली गेली. यातून 2 हजार 464 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मार्च 2021 मध्ये तर या सवलतीचा चांगलाच फायदा ग्राहकांनी घेतला त्यामुळे घरविक्रीतून विक्रमी महसूल मिळाला. मार्चमध्ये 2 लाख 13 हजार 413 घरे विकली गेली आणि यातून तब्बल 9 हजार 66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

एप्रिलपासून घरविक्रीला 'घरघर'

2020मध्ये मार्च अखेरीस लॉकडाऊन लागल्याने घरविक्री मंदावली आणि महसूल कमालीचा घटला. तर यावर्षीही मार्च अखेरीस कोरोनाचा कहर वाढला. एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागले. मे महिन्यातही लॉकडाऊन कायम होते. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये घरविक्रीलाच घरघर लागली आहे. 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्क सवलत बंद झाली. त्याचाही फटका घरविक्रीला बसला. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी एप्रिल-मे मदांवलेल्या घरविक्रीची कारणे हिच असल्याचे स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस असेल याबाबत साशंकताही व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details