महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान होईपर्यंत उत्साह कायम ठेवा, कृपाशंकर सिंह यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी सांताक्रूज, विलेपार्ले, वाकोलापासून ते कलिना या परिसरापर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत चित्रपट अभिनेते संजय दत्त, उमेदवार प्रिया दत्त यांच्यासह काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे सहभागी झाले होते.

कृपाशंकर सिंह

By

Published : Apr 26, 2019, 8:08 AM IST

Updated : Apr 26, 2019, 8:20 AM IST

मुंबई - यावेळी होत असलेले लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचे आणि भारतीय समाजाचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी आदी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदान पूर्ण होईपर्यंत आपला उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी गुरुवारी(ता. २६) कलिना येथे केले.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी सांताक्रूज, विलेपार्ले, वाकोलापासून ते कलिना या परिसरापर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत चित्रपट अभिनेते संजय दत्त, उमेदवार प्रिया दत्त यांच्यासह काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे सहभागी झाले होते.

या रॅलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी आदी पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत काँग्रेस व प्रिया दत्त यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला होता. ही रॅली कलिना येथे ते दहा वाजता आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात उत्साह कायम होता. कृपाशंकर सिंह यांनी या रॅलीत सहभागी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, आदी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत या रॅलीतील उत्साह २९ तारखेच्या मतदानापर्यंत कायम ठेवावा आणि प्रिया दत्त यांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन केले.

प्रिया दत्त यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीला सांताक्रुज विलेपार्ले कलीना आदी परिसरातील विविध जाती समूहाच्या तसेच विविध सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था आदींच्या पदाधिकाऱ्यांनी जागोजागी स्वागत केले. आम्हाला परिवर्तन हवे आहे आणि ते परिवर्तन तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायचे आहे, असा विश्वास यावेळी अनेक मतदारांनी प्रिया दत्त यांच्यापुढे व्यक्त केला. तर चित्रपट अभिनेते संजय दत्त यांनी आपल्या स्टाईलने आपल्या बहिणीला सर्वांनी मतदान करावे, 'धन्यवाद, सबका शुक्रिया' लेकीन ये सीट आना मंगता है। असे सांगत मतदानासाठी आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी भरभरून दाद दिली.

Last Updated : Apr 26, 2019, 8:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details