मुंबई - किंग सर्कल येथील दोन्ही पूल धोकादायक असल्यामुळे दुरूस्ती करण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाकडून शुक्रवार पासून किंग सर्कल रेल्वेस्थानक ते सायन रुग्णालय उड्डाणपूलादरम्यान विनामुल्य बससेवा पुरवली जात आहे. यामुळे पादचारी प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ येणार नाही. अशीच विनामुल्य बससेवा मुंबईत इतरही भागात दिली जाणार आहे. पूल बंद असल्यामुळे रस्ता ओलांडू नका, पादचारी मार्गाचा व झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा असे सूचना फलक किंग सर्कल परिसरात लावण्यात आले आहेत.
मुंबईतील किंगसर्कल पूल बंद, पालिकेकडून मोफत बस सेवा
काही दिवसांपूर्वी किंग सर्कल स्थानका बाहेरील पादचारी पूल बंद करण्याचा निर्णयाने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी जवळील माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी. यासह रस्त्यांच्या दुतर्फा रेलिंग लावण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका व मुख्यमंत्री यांना पत्र लिहत मागणी केली होती. गुरुवारी पार पडलेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यानी याबाबत आदेश दिले होते.
काही दिवसांपूर्वी किंग सर्कल स्थानका बाहेरील पादचारी पूल बंद करण्याचा निर्णयाने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी जवळील माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी. यासह रस्त्यांच्या दुतर्फा रेलिंग लावण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका व मुख्यमंत्री यांना पत्र लिहत मागणी केली होती. गुरुवारी पार पडलेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यानी याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी कालपासून झाल्याचे दिसत आहे.
वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना येथून प्रवास करणे कठीण आहे. त्यामुळे ही सोयी सुविधा प्रशासनाने पुरवली त्याबद्दल नागरिक खूप समाधानी दिसत आहेत.