महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएमवर ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा - आंदोलकांची मागणी

आरे वाचवण्यासाठी मुंबईकर जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये 'सेव्ह आरे'चे बटण ठेवावे. यामाध्यमातून जनतेची खरी भावना सरकारला कळेल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पर्यावरणप्रेमी

By

Published : Oct 11, 2019, 4:16 AM IST

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात 'आरे बचाव आंदोलन' उभे राहिले. 29 आंदोलकांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये 'सेव्ह आरे'चे बटण ठेवावे


आरे वाचवण्यासाठी मुंबईकर जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवावे. यामाध्यमातून जनतेची खरी भावना सरकारला कळेल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिका फेटाळी होती. तरी देखील मुंबई मेट्रो रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने रातोरात झाडांची कत्तल सुरू केली. सोशल मीडियावरुन ही माहिती व्हायरल होतात शेकडो मुंबईकर, पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा


या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी, पर्यावरण गीत गायन सुरू केले. हे सर्व शांततेच्या मार्गाने सुरु असताना पोलिसांनी आपल्यावर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला. तसेच महिला, तरुण-तरुणींना अक्षरश: या ठिकाणाहून फरफटत नेले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. आम्ही खुनी-दरोडेखोर, चोर नाहीत. आमच्यावर ३५३ कलम कसे लावता, असा सवाल करत आरे बचाव आंदोलकांनी केला. आपल्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

हेही वाचा - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


केंद्र-राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत असते. आम्ही देखील मुंबईकरांचे फुप्फुस असलेले आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले, असे आंदोलकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details