महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस विधीमंडळ नेतेपदी के. सी. पडवी यांची नियुक्ती

बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्या जागी म्हणजेच विधीमंडळ नेतेपदी के. सी. पडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

By

Published : Jul 13, 2019, 11:38 PM IST

के. सी. पडवी

नवी दिल्ली - महाराष्ट्र काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी के. सी. पडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्या जागी म्हणजेच विधीमंडळ नेतेपदी के. सी. पडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details