मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतला आता राजस्थानातील करणी सेनेने सुरक्षेचे आश्वासन दिले असून कंगनाची सुरक्षा करण्यासाठी करणी सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असे मुंबई करणी सेनेचे अध्यक्ष जीवनसिंह सोलंकी यांनी म्हटले आहे.
कंगना रणौतला करणी सेनेचे कवच, विमानतळावरून घरी सुखरूप पोहचवणार
अभिनेत्री कंगना रणौतला सुरक्षा देण्याचे आदेश आता राजस्थानातील करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंबई करणी सेनेला दिले आहेत.
जीवनसिंह सोलंकी
दरम्यान, कंगना रानौत विरोधात शिवसेना तर, बचावासाठी आरपीआयनंतर आता करणी सेनाही मैदानात उतरली आहे. कंगनाला सुरक्षा देण्याचे आदेश करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामनी यांनी आम्हाला दिले असल्याचे मुंबई करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकी यांनी सांगितले.
हेही वाचा -धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी रामदास आठवले उतरणार रस्त्यावर
Last Updated : Sep 7, 2020, 8:12 PM IST