मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरु झाली असून, अनेकजन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पक्षांतराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. पक्षांतर करणाऱ्यांवर टीका करताना पाटील यांनी मराठीतील एका म्हणीचा आधार घेतला आहे.
'खोडवा उसाने साखरेला उतारा पडत नाही', पक्षांतर करणाऱ्यांना जयंत पाटलांचा टोला
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरु झाली असून, अनेकजन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पक्षांतराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
‘उसाच्या खोडव्याला साखरेचा फार उतारा पडत नाही. त्यासाठी रान रिकामं करून नवी लागण करावी लागते’..! अशा मराठीतील म्हणीचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी पक्षांतर केलेल्यांवर निशाणा साधला.
लढाईच्या वेळी जो बरोबर राहतो तोच खरा कार्यकर्ता
पक्ष अडचणीतून जात असताना अनेकजण पक्षांतर करत आहेत. मात्र, ज्यांचा पक्षाला काहीच उपयोग नाही, असे लोक पक्षातून गेल्याने नव्या लोकांना काम करण्याची संधी मिळेल. लढाईच्या वेळेस काहीजण पक्ष सोडून जात असल्याचे पाटील म्हणाले.