महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil : अमित शाह यांची भेट घेतली का? जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू होती. यावर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'या सर्व बातम्या खोट्या असून, मी शरद पवारांसोबतच आहे', असे ते म्हणाले.

By

Published : Aug 6, 2023, 4:38 PM IST

Updated : Aug 6, 2023, 4:45 PM IST

Jayant Patil
जयंत पाटील

मुंबई :गृहमंत्री अमित शाह सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांचा राज्य मंत्रिमंडळातही समावेश होईल असे बोलले जात होते. आता या चर्चांना खुद्द जयंत पाटील यांनीच पूर्णविराम दिला आहे.

'या बातम्यांमुळे माझी करमणूक होत आहे' : 'अमित शाहांसोबत माझी कुठलीही भेट झाली नाही. मी अजित पवारांसोबत जाण्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु झाला आहे. असे करणे बरोबर नाही', अशा शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिले. 'मी शरद पवारांची साथ सोडणार या बातम्यांमुळे माझी सकाळपासून करमणूक होत आहे. मात्र आता हे सर्व थांबवा', अशी विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांना केली.

'मी शरद पवारांसोबतच आहे' : 'मी मुंबईतच आहे. काल संध्याकाळी आणि आज सकाळी मी शरद पवारांसोबतच होतो. मग मी थेट पुण्याला जाऊन अमित शाहंची भेट कशी घेऊ शकेल?', असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 'इंडिया' ची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

'जेव्हाही जाईल तेव्हा सांगून जाईल' : 'मी सध्या शरद पवारांसोबतच आहे. मी कुठेही जाणार नाही. मी अमित शाहांची भेटही घेतली नाही. माझ्याबद्दल विनाकारण बातम्या चालवल्या जातात. यामध्ये कहीही तथ्य नाही. मात्र मी जेव्हाही जाईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल', असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहे. मात्र अशा बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गिरीश महाजन यांचे मोठे विधान, म्हणाले, अमित शाहांचा दौरा...
  2. NCP Political Crisis: जयंत पाटील यांचा भाजपबरोबर 'सहकार'? अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण
  3. Uday Samant On Jayant Patil : जयंत पाटलांनी आधीच अजित पवारांसोबत यायला हवं होतं - उदय सामंत
Last Updated : Aug 6, 2023, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details