महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोस्टल रोड प्रकल्पात इस्त्राइल इको फ्रेंडली विटांचा होणार वापर, समुद्री जीवांना वाचविण्यासाठी निर्णय

कोस्टल रोडमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती. तसेच मच्छीमारांचा व्यवसाय बंद होईल, अशी भीती देखील मच्छीमारांनी व्यक्त केली होती. त्यावर उपाय म्हणून समुद्री जीवांना धोका निर्माण होऊ नये, तसेच मच्छीमारांचा व्यवसायही सुरू राहावा म्हणून कोस्टल रोडच्या कामासाठी इको फ्रेंडली विटा वापरल्या जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली.

कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई कोस्टल रोड
कोस्टल रोड प्रकल्प

By

Published : Feb 13, 2020, 10:47 AM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पालिकेकडून कोस्टल रोड बांधला जात आहे. या रोडच्या कामासाठी इकोफ्रेंडली विटा वापरल्या जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली आहे. कोस्टल रोडच्या बांधकामामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावर उपाय म्हणून पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

यावर पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. कोस्टल रोडमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती. तसेच मच्छीमारांचा व्यवसाय बंद होईल, अशी भीती देखील मच्छीमारांनी व्यक्त केली होती. त्यावर उपाय म्हणून समुद्री जीवांना धोका निर्माण होऊ नये, तसेच मच्छीमारांचा व्यवसायही सुरू राहावा म्हणून कोस्टल रोडच्या कामासाठी इको फ्रेंडली विटा वापरल्या जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली.

काय आहे कोस्टल रोड?

पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी 'शामलदास गांधी उड्डाणपूल' (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते 'राजीव गांधी सागरी सेतू' (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. १६ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. या प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार, कोळीवाडे आणि ब्रिचकॅन्डी येथील रहिवासी व काही सामाजिक संस्थांनी विरोध करत उच्च न्यायालयात या प्रकल्पाला आव्हान दिले होते.

पर्यावरण विषयक परवानग्या न घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले -

कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्याने समुद्री जीवांना धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. प्रकल्प राबवताना महापालिका प्रशासनाने पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या प्रकल्पासाठी १६ जुलैला उच्च न्यायालयाने, तर १९ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. नवे बांधकाम न करण्याच्या अटीवर न्यायालयाने १५४ दिवसांनी स्थगिती उठवली आहे.

समुद्री जीवांचे होणार रक्षण -

कोस्टल रोडमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामासाठी असलेली स्थगिती उचलल्यानंतर पालिकेने समुद्री जीव आणि कोळी बांधवांची गंभीर दखल घेतली आहे. सिमेंट काँक्रीटच्या बांधकामांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्री जीवांना धोका निर्माण होऊ नये म्हणून इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारित इको फ्रेंडली विटा वापरल्या जाणार आहेत. या विटांचा थर कोस्टल रोडच्या भिंती आणि पिलरच्या बाजूला लावण्यात येणार आहे. या विटांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्री जीवांचे प्रजनन होणार आहे. यामुळे मच्छीमारांनाही आपला व्यवसाय करणे सोपे होणार आहे.

त्याचबरोबर, कोळी बांधवांना आपल्या बोटी समुद्र किनारी आणता याव्यात यासाठी योग्य जागा ठेवली जाणार असल्याचे आयुक्त परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाबाबत अधिक जागरुकता आणली असून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. शिवसेना नेहमीच पर्यावरण रक्षणाच्या बाजूने राहिली आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-शासकीय कार्यालयांनंतर आता शाळांनाही हवाय पाच दिवसांचा आठवडा

ABOUT THE AUTHOR

...view details