महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इमारतींपेक्षा झोपडपट्टी भागातील व्यक्तींमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात झाला हे तपासण्यासाठी दुसऱ्यांदा सेरो सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्येही झोपडपट्टी भागातील व्यक्तींमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. तर, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

By

Published : Oct 2, 2020, 2:11 AM IST

individuals-in-slums-have-higher-levels-of-antibodies-than-buildings-in-mumbai
individuals-in-slums-have-higher-levels-of-antibodies-than-buildings-in-mumbai

मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात झाला हे तपासण्यासाठी पालिकेने दुसऱ्यांदा सेरो सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्येही अँटिबॉडीजचे प्रमाण झोपडपट्टी भागातील व्यक्तींमध्ये अधिक असल्याचे आढळून आले आहे. झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के आढळून आले आहे. रक्तातील अँटिबॉडीजचे प्रमाण ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आले आहे. तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड २’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाले होते.

आर/उत्तर दहिसर, एम/पश्चिम चेंबूर आणि एफ/उत्तर माटुंगा या तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. याच्या दुस-या फेरीत अंदाजित केलेल्यात ५ हजार ८४० एवढया लक्ष्य नमुन्यांपैकी ५ हजार ३८४ नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी ७२८ व्यक्ती नियुक्त करण्यात आल्या होत्या.

तर दुस-या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के आढळून आले आहे. रक्तातील ऍन्टीनबॉडीजचे प्रमाण ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आले आहे. तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ऍन्टीेबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

महत्त्वाचे निरीक्षण -

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या अहवालातील आकडेवारीनुसार पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीत झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. तर बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये आंशिक वाढ नोंदविण्‍यात आली आहे.

तर, आरोग्य विभागातील दवाखाने, हेल्थ पोस्ट, आरोग्य कार्यालय, फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये २७ टक्के अँटिबॉडीजचे प्रमाण आढळून आले आहे. दरम्यान, आरोग्‍य कर्मचाऱ्यांद्वारे मास्‍कचा करण्‍यात येत असलेल्‍या सुयोग्‍य वापर आणि हातांची करण्‍यात येत असलेली नियमित स्‍वच्‍छता यामुळे हे शक्‍य झाले असावे.

पहिल्या फेरीचा अहवाल -

पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी अँटिबॉडीजची पडताळणी करण्यात आली. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के ऍन्टीेबॉडीज प्राबल्य आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details