मुंबई :कोळसा टंचाईमुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेल्या वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रुपात मिळालेले कमी अनुदान अशा अनेक कारणांमुळे महावितरणाचा वीज खरेदी खर्च खूप (Increased Electricity Rates) वाढला. त्यासाठी आता महावितरणाला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज आहे. त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ असून ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची भीती वर्तवली जात आहे.
महानिर्मितीची सर्वाधिक भिस्त कोळशावर :विविध कारणांमुळे महागलेल्या वीज खरेदीपोटी महावितरणाला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता असून यामुळे महावितरणाच्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्य सरकारी महावितरण ही कंपनी सर्वाधिक वीज महानिर्मितीकडून खरेदी करते. महानिर्मितीची सर्वाधिक भिस्त औष्णिक अर्थात कोळशावर आधारित विजेवर असते. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात व यावर्षी एप्रिल - मे दरम्यान कोळसा उपलब्धता घटली व त्याचवेळी मागणी उच्चांकावर गेली होती. त्यानंतर जुलै - ऑगस्टमध्ये देखील महानिर्मितीला महागड्या कोळशाने वीज निर्मिती करावी लागली. महागड्या दराने महावितरणाला वीज विक्री करावी लागली आहे. याच प्रकारे खाजगी औष्णिक वीज उत्पादकांनीही महागडी वीज महावितरणला विकली (monthly bill will increase by Rs 200 of consumers) आहे.