मुंबई - बच्चे कंपनीसाठी डिजीटल पुस्तके आणि शैक्षणिक व्हिडिओ असलेल्या आगळ्या वेगळ्या डिजीटल 'कॅराव्हॅन'चे लोकार्पण मंगळवारी राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या आनंदीनी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात झाले. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
हेही वाचा - विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच; आझाद मैदानावर ठिय्या
फिरत्या बसमध्ये शैक्षणिक व्हिडिओ, ४००० गोष्टींच्या ई-पुस्तके, अंध मुलांसाठी ध्वनी पुस्तके, पहिली ते दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम, असा संग्रह या ग्रंथालयात आहे. तसेच बसमध्ये १३ टॅब, १३ टच स्क्रीन टीव्ही व शैक्षणिक चित्रपटांसाठी मोठी स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस शाळांमध्ये जाऊन मुलांना हा खजाना उपलब्ध करुन देणार आहे. राज्यातील हा आगळा वेगळा व पहिला असा उपक्रम राबवण्यात येत आहे.