महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या कोणत्या विभागाला झाला 'लाभ'

आज राज्य मंत्रीमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली.

By

Published : Feb 4, 2019, 3:50 PM IST

मंत्रालय

मुंबई -आज राज्य मंत्रीमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण, संक्रमण शिबीरातील रहिवाश्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन, राज्य मुद्रा शुल्क अभय योजना, मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बलांना मोफत व सवलतीच्या शस्त्रक्रियेचा लाभ यासह महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय-


१) समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी १० टक्के पदे आरक्षित करण्यास मान्यता.


२) मुंबई शहर व उपनगरात अस्तित्वात असलेल्या संकमण शिबिरातील रहिवाश्यांचे त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास मान्यता. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार.


३) राज्यात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याचा निर्णय.

४) मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात धर्मादाय नेत्र रुग्णालयात किंवा वैद्यकीय केंद्रांत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार. यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यात येणार.

ABOUT THE AUTHOR

...view details