मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार सुरू असलेल्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.
मुंबई पावसाच्या दिवसभरातील अपडेट्स
-
गेल्या दोन तासांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत आहे. मात्र, मध्यरात्रीपासून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती 'जैसे थे'च आहे.
- पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. सीएसएमटीवरून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळापर्यंत विशेष गाड्या सोडल्या, तर घाटकोपरवरून सीएसएमटीकडे येणारी एक रेल्वे सोडण्यात आली.
- पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. विदर्भ तसेच मराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा
- चांदीवलीतली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. त्यामुळे जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत.
- मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा घेतला आढावा
- मुख्य विमानतळावरील मार्ग हा बंद करण्यात आला आहे. दरम्यान पर्यायी धावपट्टी कार्यरत राहणार आहे.
- सायन आणि सांताक्रुझ, दादर, किंग सर्कल येथे पाणी साचले
-
कुर्ल्यातील जवळपास १००० नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षीत स्थळी हलविले.
- वांद्रे एसपी रोड वाहतुकीसाठी बंद
- वाकोला पोलीस ठाण्यात पाणी साचले
- चांदीवली संघर्षनगर येथील रस्ता खचला, यात काहीजण वाहून गेल्याची भीती