महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्यानेच मी महायुतीसोबत - रामदास आठवले

राजकारणात काम करायचे असते तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. मला राज्यसभा देण्याचे आश्वासन दिले गेले आहे तसेच एनडीए सरकार सत्तेत आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ देण्याचा आश्वासन दिले गेले आहे.

मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याने मी महायुतीसोबत

By

Published : Apr 12, 2019, 3:23 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबई (उत्तर मुंबई) लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा होती. मात्र मला राज्यसभा आणि पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यास मंत्रिपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यामुळे मी महायुती सोबत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याने मी महायुतीसोबत

यावेळी लोकसभेला जाता आले नाही मात्र पुढच्या वेळेला बघू असे सांगून आपण आजही लोकसभेसाठी दावेदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलुंडमधील भीम महोत्सव या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रामदास आठवले आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ईशान्य मुंबईमधून निवडणूक लढवावी ही माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. या मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास मी कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी भाजपची अपेक्षा होती. कमळ या चिन्हावर निवडणूक न लढवल्यास मला कमी मत मिळतील, असे त्यांचे म्हणणे होते. मी कमळावर निवडणूक लढवणार नाही हे भाजपला स्पष्ट सांगितल्याने त्यांनी सोमय्या यांच्या जागी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली, असे आठवले यांनी सांगितले.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी देखील आठवले यांना उमेदवारी न दिल्यास प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. याबाबत बोलताना राजकारणात काम करायचे असते तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. मला राज्यसभा देण्याचे आश्वासन दिले गेले आहे तसेच एनडीए सरकार सत्तेत आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ देण्याचा आश्वासन दिले गेले आहे. त्यामुळे मी पुन्हा प्रचाराला लागलो आहे, असे आठवले यांनी सांगितले. महाराष्ट्रातून ४० जागा जिंकुन आणण्यासाठी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि मी प्रयत्न करत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details